उत्तराखंडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भीषण रस्ते अपघात झाला आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात शुक्रवारी चमोली येथे एक सुमो गाडी खोल दरीत पडल्यानंतर कार खाली पडली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर, पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. यावेळी त्यांनी जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले.

उत्तरकाशी जिल्ह्यातील धरसू-यमुनोत्री महामार्गावर ब्रह्मखलजवळ एका कारला अपघात झाला. या गाडीत एकूण 6 जण होते. ज्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. डिझास्टर ऑपरेशन सेंटरकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये 6 जण होते. ज्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना शनिवारी दुपारी 12:30 वाजता घडली. UK 10A – 0571 हे वाहन उत्तरकाशीकडे येत असताना अचानक नियंत्रण सुटून 100 मीटर खोल दरीत कोसळले. घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू झाले आहे. चमोली जिल्ह्यात शुक्रवारी सुमो कोसळून दोन महिलांसह १२ जणांचा मृत्यू झाला होता.