पुलाचा कठडा तोडून कार ओढय़ात कोसळली, 5 जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्यावर पडलेल्या टायरचा अंदाज चालकास न आल्याने वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटले आणि पुलाचा कठडा तोडून कार ओढय़ात कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर 13 वर्षांची मुलगी या अपघातात सुदैवाने बचावली आहे.

या अपघातात वसीम हरून मुल्ला (41), अनसुरा बेगम हरून मुल्ला (41), रेश्मा हलदार (35), हासिना बेगम हरून पठाण (54), सामिया मोमीन हलदार (14, सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला. तर मासुमा मोमीन हलदार (13) ही बचावली आहे. नगर येथील छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाजवळ रविवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडली.