करीयर : तालासुरांची दुनिया

>>प्रतिनिधी

वाद्य आणि सूर यांचं एकमेकांशी घनिष्ठ नातं. वाद्यातून घेतलेला तालाचा वेध ही पुरातन कला. कालानुरूप त्या अधिकाधिक विकसित होत आहेत. वाद्यांच्या आधारावरच सूर-तालाचा मेळ जुळून येतो. बासरी, धातूपासून बनलेली शहनाई, हार्मोनियम, वीणा, गिटार, व्हायोलिन, तबला, ढोलक, ड्रम्स, माऊथ ऑर्गन अशी वाद्ययंत्रे विकसित होत असतात. आपल्याकडे वाद्यांची समृद्ध परंपरा आहे. या समृद्ध परंपरेचा वारसा जपणे हा करीअरचा एक अनोखा मार्ग आहे. ज्यांना आपल्या आवडीचे वाद्य वाजवण्याची आवड आहे, ते यामध्ये करीअर करू शकतात. ड्रम्स, कॅसियो, माऊथ ऑर्गन अशा पाश्चात्त्य वादनाचा प्रभावही सध्या वाढत आहे. सिनेमा, नाटक, दूरचित्रवाणी, रेडिओ या ठिकाणी वाद्ययंत्राची आणि वादकाची आवश्यकता असते. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी मिळू शकतात. अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या वाद्ययंत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्था आहेत. गुरु-शिष्य परंपरेअंतर्गतही वाद्यकलेचे शिक्षण घेता येते.

आवश्यक गुण

> वादन कलेत करीअर करण्यासाठी या कलेत आवड असण्याची आवश्यकता आहे.

> वाद्य वाजवण्यासाठी संगीताची आवड हवी.

> वाद्यातील बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास करणे, निरीक्षण करण्याची क्षमता असावी लागते.

> हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीताची ओढ आणि त्याप्रति संवेदनशील मनाची गरज आहे.

> या क्षेत्रात करीअर करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही.

अभ्यासक्रम

> वादनाच्या अभ्यासक्रमातही गायन आणि नृत्याचा समावेश असतो.

> ज्युनियर डिप्लोमा हा अभ्यासक्रम 10वीनंतर दोन वर्षे असतो.

> सीनियर डिप्लोमा पूर्ण करण्यासाठी चार वर्षे लागतात.

> प्रभाकर (संगीत स्नातक) हा सहा महिन्यांचा छोटा कोर्स आहे.

> प्रवीण (संगीत स्नातकोत्तर) हा कोर्स आठ वर्षांत पूर्ण होतो. हे सर्व कोर्स एकमेकांशी संबंधित आहेत.

संधी

> महाविद्यालय, शाळा येथे शिकवण्यासाठी वादक शिक्षकांची आवश्यकता असते.

> सरकारच्या कला संस्कृती विभागातही वादक कलाकारांची नियुक्ती केली जाते.

> स्वतःची स्वतंत्र संस्था सुरू करून वादनाचे प्रशिक्षण देता येते.

संगीत अकादमी

> संगीत नाटक अकादमी

> गांधर्व महाविद्यालय

> आजीवन संगीत अकादमी

> बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, वाद्य संगीत विभाग

प्रतिनिधी

आपली प्रतिक्रिया द्या