
सामना प्रतिनिधी । लातूर
निलंगा तालुक्यातील मौजे माळेगाव शिवारातून म्हैस व तिचे रेडकू, गाय व तिचे वासरु अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द 70 हजार रुपयांची जनावरे चोरुन नेल्याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीप्रकरणी शिवाजी गणपती आरीकर (रा. माळेगाव) यांनी तक्रार दाखल केली. तक्रारदाराने त्यांच्या शेतातील गोठ्यात म्हैस व तिचे रेडकू आणि गाय व तिचे वासरु बांधले होते. जनावरे बांधून घराकडे गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी ही जनावरे चोरुन नेली. 70 हजार रुपयांची जनावरे चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


























































