
सामना ऑनलाईन, हैदराबाद
आंध्र प्रदेश सरकारने एक महत्वाचं परिपत्रक जारी करत राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयचा हस्तक्षेपाचा अधिकार पूर्णपणे काढून घेतला आहे. प्रत्येक राज्य सरकार हे दिल्लीतील विशेष पोलीस आस्थापनेला त्यांचे अधिकार संबंधित राज्यात वापरण्यास होकार देत असते. हा होकार आंध्र प्रदेशने मागे घेतल असल्याचं परिपत्रक आंध्र प्रदेशाच्या गृह विभागाच्या सचिव ए.आर.अनुराधा यांनी जारी केलं आहे. हा होकार काढून घेतल्याने आंध्र प्रदेशात होणाऱ्या कोणत्याही घटनेचा तपास करण्याचे अधिकार सीबीआयला उरलेले नाहीत.
Andhra Pradesh Government has withdrawn the ‘General Consent’ given to the members of Delhi Special Police Establishment to exercise powers & jurisdiction in the state. In the absence of this permission, CBI can’t interfere with any case that takes place within the limits of AP pic.twitter.com/bUgvB3hgBD
— ANI (@ANI) November 16, 2018
मुख्य सचिवांनी जारी केलेलं हे पत्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी खेळलेली एक मोठी खेळी असल्याचं मानलं जात आहे. नायडू हे मोदींविरोधात विरोधकांना एकत्र करण्याचं काम करीत आहे. त्यांनी सीबीआयला हाताशी धरून मोदी विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा सातत्याने आरोप केला आहे.
This decision has been taken in wake of incidents happening in CBI since last 6 months. It lost its independence due to involvement of Modi-led Union govt which is using CBI as tools against political opponents by means of preparing fabricated statements: Lanka Dinakar, TDP pic.twitter.com/FzEJpOZSyh
— ANI (@ANI) November 16, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीबीआय, आरबीआय सारख्या संविधानिक संस्थांना खिळखिळं करून स्वत:च्या हातचं बाहुलं बनवत असल्याचा आरोप नायडू यांनी केला आहे. केंद्रातील सगळ्या महत्वाच्या पदांवर गुजरातमधील अधिकारी आणून बसवले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. सीबीआयचे रजेवर पाठवण्यात आलेले विशेष संचालक राकेश अस्थाना हे मोदींचे इंटेलिजन्स मॅन असल्याचाही त्यांनी आरोप केला होता. हे आरोप केल्यानंतर सीबीआयचा वापर करून आंध्र प्रदेशात आपल्याला नामोहरम करण्याचे प्रयत्न होतील असं नायडूंना वाटत असल्याने त्यांनी सीबीआयला आपल्या राज्यात थेट बंदीच घातल्याची चर्चा तिथल्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.





























































