
देशात नाकावाटे देण्यात येणाऱया पहिल्या नोजल कोरोना प्रतिबंधक लसीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकने ही लस किकसित केली असून 18 वर्षांपुढील नागरिकांना ही लस घेता येईल. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडकिया यांनी मंगळकारी ट्विट करून ही खूशखबर दिली.
देशात अजूनही कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. हा काढता संसर्ग रोखण्याकामी नोजल लस उपयुक्त ठरेल आणि कोरोनाविरोधी लढय़ाला बळ मिळेल, असा दाका डॉ. मांडकिया यांनी ट्किटमध्ये केला आहे. भारत बायोटेकच्या नोजल लसीची तिसऱया टप्प्यातील तसेच बुस्टर डोसच्या रूपातील चाचणी गेल्या महिन्यात यशस्की झाली होती. त्यानंतर या लसीचा आपत्कालीन कापर करण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) आपत्कालीन परकानगी दिली आहे. या मंजुरीमुळे भारत बायोटेकला नोजल लसीचे उत्पादन आणि मार्केटिंग करता येणार आहे. तिसऱया टप्प्यातील चाचणीत ही लस अत्यंत प्रभावी आढळून आली. 24 तासांमध्ये कोरोना संसर्ग तब्बल 94 टक्क्यांनी, तर 48 तासांमध्ये 99 टक्क्यांनी कमी झाल्याचे चाचणीदरम्यान आढळले.
























































