लग्नासाठी स्त्री-पुरुष दोघांचेही वय 18 करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तरुण-तरुणींना 18 व्या वर्षी मतदानाचा अधिकार देऊन सरकार निवडण्याची मुभा दिली जाते. 18 व्या वर्षी तरुण पिढी सक्षम समजली जात असेल तर लग्नासाठीच्या वयामध्ये भेद कशासाठी? स्त्री आणि पुरुष दोघांचेही लग्नासाठीचे वय 18 करा अशी महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कायदा आयोगाने सरकारकडे केली आहे.

कुटुंब कायद्यातील सुधारणा करण्याविषयी कायदा आयोगाने केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. पत्नीचे वय पतीपेक्षा कमी असावे असा समाजामध्ये दृष्टिकोन आहे, परंतु लग्न करण्यासाठी वयाच्या अटीमध्ये असा भेदभाव करण्याची गरज नाही. सध्या लग्नासाठी तरुणाचे वय 21 आणि तरुणीचे वय 18 असावे अशी अट आहे. ही वयाची अट काढून टाकून दोघांचेही वय 18 असावे असा बदल करावा असे आयोगाने म्हटले आहे. सर्व समाजांमध्ये समानता आणण्याआधी स्त्री-पुरुषांच्या अधिकारांमध्ये समानता आणली पाहिजे असे मतही आयोगाने नोंदविले.

देशात समान नागरी कायदा लागू करण्याऐवजी पर्सनल लॉमध्ये सुधारणा गरजेची आहे. मूलभूत अधिकारी आणि धार्मिक स्वातंत्र्यामध्ये संतुलन हवे, असेही आयोगाने म्हटले आहे.