दादर स्थानकातील फलाट क्रमांक बदलले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांकात मध्य रेल्वेने  बदल केला आहे. बुधवारपासून फलाट क्रमांक 10 ऐवजी फलाट क्रमांक ‘9 ए’ आणि फलाट क्रमांक ‘10 ए’ ऐवजी फलाट क्रमांक 10 म्हणून ओळखला जाईल. उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल-एक्प्रेसची सेवा व्यवस्थित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. सध्या दादर स्थानकातून दररोज सुमारे पाच लाख प्रवासी प्रवास करतात.