मध्य रेल्वेवर आज माटुंगा-मुलुंडदरम्यान मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे आपल्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रविवार 15 जानेवारी रोजी माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेणार आहे. त्यामुळे सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱया डाऊन जलद लोकल गाडय़ा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील तर ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.