मध्य रेल्वेची राजधानी एक्स्प्रेस चक्क 13 मिनिटे लवकर आली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rajdhani-express-central-railway

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वे म्हटली की रखडणार हे ठरलेले आहे. त्यातही एखादी ट्रेन वेळेच्या आधी पोचणे म्हणजे अशक्यच. मध्य रेल्वेवर धावणारी मुंबई ते दिल्ली ही पहिली राजधानी एक्स्प्रेस याला अपवाद ठरली आहे. मुंबईवरून शनिवारी सुटलेली राजधानी एक्प्रेस पुन्हा मुंबईला नियोजित वेळेच्या आधी तब्बल 13 मिनिटे पोचून तिने वक्तशीरपणाचा नवा विक्रमच जणू केला.

राजधानी एक्प्रेमस गाडी क्रमांक 2221 बुधवारी आणि शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नाशिकमार्गे हजरत निझामुद्दीन, दिल्लीला जाते. या एक्प्रेसला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झांशी जंक्शन, आग्रा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. दिल्ली आणि मुंबई या दोन राजधान्यांचा दुवा नाशिक असणार आहे.