न्यू इयरमध्येही ‘मरे’ची रडरड, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-local-001
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेच्या शीव-कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी जलद मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे जलद मार्गावरील गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.

दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि सुमारे अर्ध्या तासात बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर आता या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र उपनगरीय गाड्यांची वाहतूक सुमारे 20 मिनिटे उशिराने सुरू आहे, अशी माहिती मिळते.