
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे मे 2026 मध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या संधीच्या ‘MHT-CET (PCM)’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत एकूण 12 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळाले आहे.
पीसीएम ग्रुपच्या दुसऱ्या संधीची ही परीक्षा 12 ते 20 मे 2026 या कालावधीत राज्यात 187 परीक्षा केंद्रांवर (CBT) पद्धतीने 11 सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण 3,21,918 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 2 लाख 85 हजार 121 (88.57%) विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षा देणाऱयांमध्ये 1 लाख 74 हजार 698 विद्यार्थी, 1 लाख 10 हजार 413 विद्यार्थिनी आणि 10 तृतीयपंथीय (Transgender) विद्यार्थ्यांचा समावेश होता.




























































