महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील 20 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना सुखसागर नगर कात्रज येथील जेठमलजी गांधी यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी, सिता संजय पुंगलिया (वय 44, रा. सुखसागरनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सीता गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जेठमलजी गांधी यांच्या बंगल्यासमोरून पायी चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 20 हजारांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत.