यवतमाळ दारव्हा रोडवरील मुंढळ जवळ चक्का जाम; ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी शिवसैनिक आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

दारव्हा यवतमाळ रोडवरील बोरी अरबजवळील मुंढळ फाट्यावर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांची स्थिती सुधारावी, या मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

मुंढळ, वघळ,दुधगाव, कंझरा, दहिफळसह अश्या अनेक ग्रामीण भागात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे अनेक अपघात झाले आहे. प्रशासनाकडे याची वारंवार तक्रार करण्यात आली आहे. मात्र, प्रशासन व सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्या आरोप शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला आहे. दारव्हा यवतमाळ रोड वरील मुंढळ गाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्या मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थी वर्गाला शाळेत जाण्याकरिता तथा गावकऱ्यांना प्रवासासाठी तारवेरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडे अनेकदा रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. 10 दिवसाच्या आत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या वेळी यवतमाळ जिल्हा बांधकाम अधीकारी हजर होते. दारव्हा बांधकाम उपविभागीय अधिकारी राठोड व तसेच पोलीस फौजफाटा, दारव्हा तालुका दंडाधिकारी, तहसीलदार कुमरे आदी सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित होते. बांधकाम विभाग अधिकारी यवतमाळ यांनी निवेदन स्वीकारत काम लवकरच हाती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाला सुरुवात करु, असे यावेळी आश्वासन दिले. या मागणीवर अंबलबजावणी करुन तात्काळ कामाला सुरुवात करण्यात येईल असे सांगितले. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दारव्हा तालुका प्रमुख अजय गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी युवासेना यवतमाळ उपजिल्हा प्रमुख गिरीजानंद कळंबे बोरी ,अरब उपशहर प्रमूख एरार अहमद शेख यांच्यासह आशिष सावकार, तालुका संघटक सुधाकर पिंगाणे,उपतालुका प्रमुख रामेश्वर गिरी, संजय देशमुख, विभाग प्रमुख गोपाल गायकवाड, रामा लोंढे, गजानन केंबल, विलास राठोड,मधुकर ठाकरे, आशिष सावरकर, सदाशिव बांडे, देवरावजी सरतापे, सुरेश चतुर, शेख अब्बास यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.