दुर्मिळ शॅमेलियन सरड्याचे गोंधळे येथे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण तालुक्यातील गोंधळे (जुनेवाडी) रस्त्यावर काही जणांना हिरव्या रंगाचा सरडा दिसला. इतर सरड्यांपेक्षा हा सरडा वेगळा असल्याने त्याची माहिती त्वरित रत्नागिरीतील वर्ल्ड फॉर नेचर पथकाला देण्यात आली. माहिती मिळताच त्यांचे पथक गोंधळे येथे दाखल झाले.

प्रत्यक्षदर्शी पाहणीत हा शॅमेलियन सरडा (रंग बदलणारे गिरगीट) असल्याचे निष्पन्न झाले. हा सरडा या भागात दुर्मिळ असल्याचे वर्ल्ड फॉर नेचरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला रेस्क्यु करून सुरक्षित निसर्ग सान्निध्यात सोडण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हा शॅमेलियन सरडा आढळला ते ठिकाण वन्य जीवांसाठी योग्य व निसर्गसंपन्न आहे. अशा प्रकारची जंगले वाचली पाहिजेत. यावर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे तेथे आढळणाऱ्या निसर्गसंपत्तीची माहिती मिळेल शिवाय निसर्ग अभ्यासाला वाव मिळेल, असे मत वर्ल्ड फॉर नेचरचे कार्याध्यक्ष प्रथमेश पवार यांनी व्यक्त केले आहे. यावेळी अमित जाधव, स्वप्निल जाधव, अविनाश जाधव, प्रथमेश पवार उपस्थित होते.