चंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा

46

सामना ऑनालाईन । नवी दिल्ली

महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या मुख्यालयातून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.  मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांना यांनी आज भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

तर भाजपचे मुंबई अध्यक्ष पदावर असलेले आशिष शेलार यांना राज्यात मंत्री देण्यात आल्यानंतर आता मंगलप्रभात लोढा यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे.