चंद्रपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरमध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सुरेश रामटेके (55) आणि अश्विनी मेश्राम (16) अशी मृतकांची नावं असून हे दोघे बकऱ्या चारण्यासाठी गावाजवळ गेले होते. संध्याकाळी 5 च्या दरम्यान विजेच्या कडकडाट आणि पाऊस झाला. याच दरम्यान वीज पडून या दोघांचा मृत्यू झाला.