मार्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीवर अस्वलाचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्निंग वॉकला निघालेल्या एका 50 वर्षीय पुरुषावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात नंदकिशोर शेंडे (50) हे जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता तात्काळ दाखल करण्यात आलं. सिंदेवाही शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे.