चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजुरा तालुक्यातील विरुर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला असून, गोविंदा भीमराव मडावी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. स्वतःच्या शेतात काम करत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. मध्य चांदा वनविभागाच्या मौजा नवेगाव येथील कक्ष क्र. 145 मधील ही घटना आहे.

राजुरा आणि विरुर वनक्षेत्रात गेले 6 महिने या वाघाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत त्याने 6 ग्रामस्थांचा बळी घेतलाय. गेले काही दिवस वनविभागाची चमू हा वाघ जेरबंद करण्यासाठी परिसरात तैनात असून आता पुन्हा एकदा वाघाने हल्ला केल्यानंतर वाघाला ठार मारण्याची मागणी पुढे येत आहे.