
आझाद समाज पार्टीचे खासदार चंद्र शेखऱ आझाद हे कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात संसदेतील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली सोमवार रात्रीपासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील आझाद यांनी केली आहे.
#WATCH | Delhi: Aazad Samaj Party – Kanshi Ram chief and MP Chandra Shekhar Aazad sits on a protest at the Parliament premises, over paper leak matter, Police action during yesterday’s CJP protest march, with a demand for resignation of Union Education Minister Dharmendra… pic.twitter.com/PcNirclhGp
— ANI (@ANI) July 21, 2026
जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, तरीही लोकशाहीत लाठीमार करून विरोध किंवा असंतोष मोडून काढता येत नाही. जंतरमंतरवर गेल्या 30 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे; लोकं गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. सरकार त्यांच्या मरणाची वाट पाहत होते का? काल जेव्हा देशातील तरुण रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांच्यावर करण्यात आलेला अमानुष अत्याचार सुन्न करणारा होता. देशातील तरुण उपाशी-तहानलेले रस्त्यावर भटकत असताना आणि आंदोलन करत असताना मी गप्प बसू शकत नाही, असे मला वाटले. त्यामुळे मी स्वतः या आंदोलनात सहभागी होऊन माझी जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय घेतला. जे तरुण आजही आंदोलन करत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि सरकार व पंतप्रधानांना त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आवाहन करण्यासाठी मी येथे बसलो आहे”, असे आझाद यांनी सांगितले.





























































