चंद्रशेखर आझाद यांना पुण्यात सभा घेता येणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chandrashekhar-azad-bhim-ar

सामना प्रतिनिधी, मुंबई

पोलिसांनी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात आयोजित सभेला मुंबई उच्च न्यायालयाने आज परवानगी नाकारली. यासंदर्भात हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोणताही आदेश देण्यास उच्च न्यायालयाने आज स्पष्ट नकार दिला.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे पुण्याच्या एसएसपीएमएस कॉलेजच्या आवारात रविवारी सायंकाळी रॅली काढणार होते. परंतु आयोजकांना आवश्यक त्या परवानग्या न मिळाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. सोमवारी पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी चंद्रशेखर आझाद संवाद साधणार होते. परंतु त्यालाही विद्यापीठाने नकार दिला. पोलिसांनी बेकायदेशीरपणे नजरकैदेत ठेवल्यामुळे 10 कोटींची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. नितीन सातपुते यांनी बाजू मांडली.

नजरकैद आणि अटकही नाही
आझाद यांना कोणत्याही प्रकारच्या नजरकैदेत ठेवण्यात आलेले नाही. तसेच त्यांना अटकही करण्यात आलेली नाही, अशी माहिती पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आली. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत यावर कोणतेही अंतरीम आदेश देण्यास नकार देत सुनावणी तहकूब केली.