भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लातूरमध्ये काळे झेंडे दाखवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आज लातुरात मराठा आरक्षणासाठी युवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी म्हणून मराठा समाजाच्या युवकांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला.

भाजपच्या लातूर लोकसभा मतदारसंघासातील प्रमुख 600 पदाधिकारी यांच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लातूर येथे आले होते. छञपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या तरुणांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. अचानक घोषणा देत आलेल्या युवकांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. पोलिसांनी तातडीने झेंडे जप्त करत कार्यकर्त्यांनी ही पकडले.

दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. बावनकुळे आज लातूरच्या दौऱ्यावर आहेत, यादरम्यान मराठा आंदोलकांनी हे काळे झेंडे दाखवले आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात असून आज लातूरात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.