फेसबुकवरील जाहिरातीच्या माध्यमातून दाम्पत्याची फसवणूक

गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील एका दाम्पत्याची सायबर गुन्हेगारांनी तब्बल तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नबानीता मिश्रा यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात तक्रार दाखल केली. फेसबुकवरील जाहिरातीच्या माध्यमातून नबानीता यांचे पती मृणाल मिश्रा पतीने गुंतवणूक केली होती, परंतु ही जाहिरातच बनावट निघाल्याचे नंतर उघड झाले. त्यामुळे दाम्पत्याला मोठा धक्का बसला.

फेसबुकवरील जाहिरातीला भुलून मिश्रा दाम्पत्याने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत विविध बँक खात्यांमघ्ये तब्बल 22 व्यवहार केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार केली.