शेफ सर्वेश जाधवचा पुन्हा एकदा ‘लिमका’ रेकॉर्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chef-sarvesh-jadhav

पुण्यात शेफ सर्वेश जाधव यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदुस्थानच्या विविध राज्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गोड पदार्थ तयार केले आणि तेही 2800 ग्रॅम्स वजनाच्या मापात. शेफ सर्वेश यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील हॉटेल मॅनेजमेंटच्या 28 विद्यार्थ्यांनी 2 तास 8 मिनिटात हे 28 पदार्थ एकाचवेळी तयार केले. हे सर्व गोड पदार्थ 28 सामाजिक संस्थांना भेट देण्यात येणार आहेत.

शेफ सर्वेश यांनी 2017 मध्ये जगातील सर्वात लहान पिझ्झा बनविण्याचा लिमका बुक्स ऑफ रेकॉर्ड हा केला होता.

आता या ‘स्टेट स्वीट मॅरेथॉन ऑफ इंडिया’ या उपक्रमाद्वारे दुसरा लिमका बुक ऑफ रेकॉर्ड साकारला आहे.

यामध्ये कॅफेहाऊस रिका, खाऊची बाराखडी, पु ना गेस्ट हाऊस, विष्णुजी की रसोई, ऑस्टिन 40 कॅफेहाऊस, Eat At Home, सातारा महिला ऍग्रो, ए हॉटेल मॅनेजमेंटचे कॉलेज आय एस एस एम एस,भारती विद्यापीठ, टि. म. वि., एस.आय. टी. संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.