… तर शरद पवार आम्हा सर्वांनाच घेऊन गेले असते – छगन भुजबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. तसेच शरद पवार यांना भाजपसोबत जायचे असते तर आम्हा सर्वांना घेऊन ते गेले असते. लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असून जर भाजपसोबत जायचे असते तर त्यांनीच ठरवले असते तर त्यांना कोणीही अडवले नसते, असेही छगन भुजबळ म्हणाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

भुजबळ म्हणाले की, सध्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार यांना भाजपात जायचे असते तर ते आम्हा सर्वांनाच घेऊन गेले असते. परंतु त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत जाण्याचे ठरवले होते, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच अधिवेशनाच्या कदाचित दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि याचा सर्वस्वी अधिकारी मुख्यमंत्र्यांचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.