मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणावरून एकीकडे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे आत्महत्यांचे सत्रही सुरुच आहे. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपतगाव येथील एका मराठा तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एका पाटीवर मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले आहे. गणेश काकासाहेब कुबेर असे त्या तरुणाचे नाव आहे.

गणेश कुबेरने गळफास घेत आत्महत्या केली. त्याआधी त्याने घरातील पाटीवर सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका, असे त्याने त्या पाटीवर लिहले आहे.