मध्य प्रदेशात शिवरायांच्या पुतळय़ाचे उद्या अनावरण, आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

मध्य प्रदेशात छिंदवाडा जिह्यात पांढुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळय़ाचे अनावरण 22 सप्टेंबर रोजी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुलनाथ यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळय़ाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.