खोलीत प्रेयसीसोबत होता रंगेल पती, पत्नीने रंगेहात पकडले; आधी धू-धू धुतले, मग निर्वस्त्र फिरवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) एका विवाहित तरुणाला पत्नीने प्रेयसीसोबत रंगेहात पकडले आहे. पती आणि त्याची प्रेयसी नको त्या अवस्थेमध्ये दिसल्याने पत्नीच्या संतापाचा कडेलोट झाला. यानंतर विवाहित तरुण आणि त्याच्या प्रेयसीला निर्वस्त्र करत त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. कोंडागाव (Kondagaon) जिल्ह्यातील उरन्दाबेडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बढगई या आदिवासी गावामध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधत पती प्रेयसीच्या घरी जात होता. शनिवारी दोघेही प्रेमामध्ये आकंठ बुडालेले असताना अचानक पत्नी नवऱ्याच्या प्रेयसीचे घर गाठते आणि दोघांनाही नको त्या अवस्थेमध्ये पकडते. त्यामुळे संतापाचा कडेलोड झालेल्या पत्नीने गावकऱ्यांना गोळा करून पती आणि त्याच्या प्रेयसीला आधी मारहाण केली आणि नंतर हातांना लाकडी दांडक्याने बांधले, तसेच निर्वस्त्र करून गावभर फिरवले. याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.

गावचे सरपंच लच्छुराम सलाम यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले, पतीला पत्नीने प्रेयसीसोबत नग्नावस्थेमध्ये पकडल्यानंतर त्यांनी शिक्षा देण्यासाठी गावात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विवाहित तरुण आणि त्याच्या प्रेयसीवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये असे सर्वांचे मत होते. परंतु गावकऱ्यांना हे मान्य न झाल्याने त्यांनी विवाहित तरुणाच्या पत्नीला साथ दिली आणि दोघांनाही निर्वस्त्र करत मारहाण केली.

‘झूम’वर धार्मिक कार्यक्रम सुरू असताना कपलने काढले कापडे, 45 मिनिटांचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, हे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. उरन्दाबेडा पोलीस ठाण्याचे एसबी दिव्यांग पटेल आणि अॅडीशनल एसबी राहुल देव शर्मा यांनी या घटनेनंतर घटनास्थळी भेट दिली आणि तरुणाचा पत्नीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.