नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंहला सोडले

नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह यांना सोडून दिले आहे. 3 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या बिजापुरात नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्लाकरून राकेश्वर सिंह यांचं अपहरण केलं होतं. या हल्ल्यात 22 जवान शहीद झाले होते तर अनेक जवान जखमी झाले होते.

या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी छत्तीसगडचा दौरा केला होता. यावेळी शाह यांनी बस्तरमधील शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली, तसेच जखमी जवानांची भेट घेतली होती.

नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह यांना सोडल्याच्या बातमीनंतर त्यांच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे. राकेश्वर सिंह यांच्या पत्नीने सरकारचे आभार मानले आहेत. दरम्यान, राकेश्वर सिंह यांना रुग्णवाहिकेतून विजापूर येथे आणण्यात आले आहे

आपली प्रतिक्रिया द्या