मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विमानतळावर प्रशासनाकडून स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज बुधवारी सायंकाळी 6.45 वाजता संभाजीनगरच्या दौऱ्यासाठी चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विराट जाहीर सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष विमानाने चिकलठाणा विमानतळावर सायंकाळी आगमन झाले. त्यांच्यासमवेत सौ.रश्मी उद्धव ठाकरे, तेजस उद्धव ठाकरे यांचेही शहरात आगमन झाले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटाणे, सिडकोच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपा मुधोळकर आदींनी स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडे रवाना झाले.