चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह दोघांना अटक

चीनसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. राजीव शर्मा असे त्या पत्रकाराचे नाव असून ते हिंदुस्थानी आहेत. तर त्यांच्यासोबत अटक करण्यात आलेली महिला ही चीनची तर पुरुष हा नेपाळचा आहे.

राजीव शर्मा याला त्यांच्या दिल्लीतील प्रीतमपुरा भागातून अटक केली आहे. पोलिसांना त्याच्या घरातून काही चीनी कागदपत्र सापडली आहेत. ऑफिशियल सिक्रेसी अॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. राजीव व त्यांच्या दोन साथिदारांना दिल्ली न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राजीव शर्मा यांनी द ट्रिब्युनसाठी काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या