चीनने चंद्रावर पिकवला कापूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

चंद्रावर पाणी असल्याचे समोर आल्यानंतर आता चंद्रावर पीक घेणेही शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनने चंद्राच्या पृष्ठभागावर कापसाचे पीक घेतले आहे. चीनच्या सीएनएसएने मंगळवारी एक छायाचित्र प्रसिद्ध केले असून त्यात कापसाचे बोंड तयार होत असल्याचे दिसत आहे. चंद्रावर पहिल्यांदाच अशा प्रकारे पीक घेण्यात आले आहे.

चीनच्या चांग ई- 4 मिशनच्या अंतर्गत चंद्रावर नेण्यात आलेल्या जैविक पदार्थांमध्ये कापूस, बटाटा, अरेबिडोप्सिस, खमीर आणि फळांचा समावेश आहे. पुढील 100 दिवसात उर्वरित पीक उगवतील असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या पीकांवर विशिष्ट बायोस्फीयरमध्ये संशोधन केले जात आहे. याआधीही चीनच्या अंतराळवीरांनी अंतराळात शेती केली होती. चीनच्या तियांगोंग-2 अंतराळ प्रयोगशाळेत तांदूळ व अरेबिडोप्सिसचे पीक घेण्यात आले होते. प्रतिकूल परिस्थितीत चंद्रावर पीक उगवण्यास मानवाला यश मिळाले आहे. यावरून भविष्यात चंद्रावर शेती करणे शक्य असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर कापसाचे पीक घेण्यासाठी सर्व बीजांना एका गोलाकार डब्यात ठेवण्यात आले होते. तीन किलो वजनाचे सात इंच लांब असणाऱ्या या कंटेनरचे डिझाईन चोंगकिंग विश्वविद्यालयाच्या तज्ज्ञांनी डिझाईन केले आहे. विशिष्ट अॅल्युमिनियमच्या धातुपासून हे डबे बनवण्यात आले आहेत.

।