चीनने बनवला प्रतिसूर्य; नैसर्गिक सूर्यापेक्षा 10 पट प्रकाश देणार

3778

सूर्य हा आपल्या आकाशगंगेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पृथ्वीवरील सर्व व्यवहार सूर्यावरच अवलंबून आहेत. तसेच त्यामुळे कालगणनाही करण्यात येते. पृथ्वीवरील जीवसृष्टी सूर्यामुळेच टिकून आहे. मानव आणि पृथ्वीवरील सर्व सजीवांना जगण्यासाठी सूर्याची गरज आहे. हे ओळखून चीनने प्रतिसूर्य तयार केला आहे. वैज्ञानिकांनी तयार केलेला प्रतिसूर्य नैसर्गिक सूर्याप्रमाणेच काम करणार असून त्यापेक्षा तो 10 पट जास्त प्रकाश देणार आहे.

चीनने विकसित केलेला हा कृत्रिम सूर्य अणू संरचनेवर आधारित आहे. या संरचनेमुळे सूर्यापेक्षा 10 पट जास्त पर्यावरणपूरक ऊर्जा निर्माण करता येणार आहे. हा प्रतिसूर्य 10 सूर्यांइतकाच दीप्तीमान असेल असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. चीनच्या ‘सिन्हुआ’ या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. या कृत्रिम सूर्याच्या रिअॅक्टरचे काम पूर्ण झाले असून 2020 मध्ये याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले. चीनने या प्रतिसूर्याला ‘एचएल- 2 एम’ असे नाव दिले आहे. चीनच्या नॅशनल न्यूक्लिअर कॉर्पोरेशन आणि साऊथ वेस्टर्न इन्स्टिट्यूटने हा प्रतिसूर्य विकसित केला आहे.

प्रतिसूर्याचा रिअॅक्टर पूर्णपणे कार्यक्षम असल्यास सूर्याच्या तुलनेत 13 पट जास्त तापमान निर्माण करता येणार आहे. त्याचे तापमान 200 मिलियन डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचू शकते. तर आपल्या सूर्याचे सर्वाधिक तापमान 15 मिलियन डिग्री सेल्सिअस आहे. रिअॅक्टरमधील अणूसंरचनेमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसूर्याचे तापमान वाढवणे शक्य होणार आहे. अणूंचे विघटन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. सूर्यावरही अशाचप्रकारे ऊर्जा निर्माण होते. याच प्रक्रियेचा वापर प्रतिसूर्याच्या निर्मितीसाठी करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या