माझी तब्येत बरी नाही, तुम्हीच ऍण्टिग्वामध्ये या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पीएनबी घोटाळय़ातील एक आरोपी मेहुल चोक्सी याने आता हिंदुस्थानात न परतण्याचे नवे कारण शोधले आहे. आपली तब्येत बरी नसल्यामुळे आपण तीन महिने हिंदुस्थानात येऊ शकत नसल्याचे चोक्सीने आपल्या वकिलांकरवी सांगितले आहे. त्यामुळे ‘ईडी’च्या अधिकाऱयांनीच ऑण्टिग्वामध्ये जाऊन त्याची जबानी घ्यावी अशी मागणीही वकिलांनी सुनावणीदरम्यान केली. ‘ईडी’ला सध्या ऑण्टिग्वामध्ये येणे शक्य नसेल तर त्यांनी चोक्सीची तब्येत सुधारत नाही तोपर्यंत म्हणजेच आणखी तीन महिने वाट पाहावी असेही चोक्सीच्या वकिलांनी सांगितले.