
उदय जोशी । बीड
दुष्काळाची पाहणी आणि प्रशासकीय आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड मध्ये दाखल झाले आहेत. ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी पोहोचले. तिथे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. मात्र ते आढावा बैठकीला न थांबता काही वेळातच बाहेर पडले. त्याच कारणही त्यांनी बैठकीतून बाहेर पडताना स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यातच दुष्काळ पाहणीसाठी बीडमध्ये येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात आला होता. आज मुख्यमंत्री बीड जिल्ह्यात दाखल झाले. ते बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाची पाहणी आणि प्रशासकीय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत पालकमंत्री पंकजा मुंडे, या देखील पोहोचल्या आहेत. तसेच बैठकीसाठी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. मात्र काही वेळातच धनंजय मुंडे हे या बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘बीडमधील दुष्काळ परिस्थिती, शेतकऱ्यांची स्थिती पाहता जनावरांसाठी चार छावणी, पाण्यासाठी विहिऱ्यांची परवानगी अशा गोष्टींसाठी तातडीने मदत गरजेची आहे. त्याचे निवेदन मी मुख्यमंत्र्यांना दिले आणि निघालो. कारण बैठकांवर बैठका हे काही आम्हाला मान्य नाही, दुष्काळावर मात करण्यासाठी तातडीने मदत आणि उपाय योजनांची गरज आहे. ते काम प्रशासनाचं आहे. त्यामुळे आम्ही निवेदन देऊन बाहेर पडलो.’ ‘जिल्ह्यात 1972 पेक्षा भयानक दुष्काळ आहे. खरीप रब्बी पिकांचे नुकसान मोठे आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारने तिजोरी रिकामी करावी. केवळ बैठकावर बैठक घेऊन काही होणार नाही त्यावर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे’, असे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे म्हणाले.
खरीप-रब्बी पिकांचे नुकसान मोठे आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारने तिजोरी रिकामी करावी अशी मागणी केली. खरीप आणि रब्बीच्या पीक नुकसान पोटी शेतकऱ्यांना पन्नास हजार मदत द्या टंचाई आराखडे आज टँकर मंजुरी दिली जात नाही, बोअर विहीर अधिग्रहण केलं जातं नाही, कुठं ही पाणी नाही. रोजगार हमी योजनेच्या बाबतीत नवा जीआर काढला आहे. नोंदणीकृत मजुरांना कामे रब्बीची पत्नी सोळा टक्के आहे यातील ज्वारीची किती येईल दावणीला चारा दिला पाहिजे. यात निर्णय करावा खात्यावर पैसे किती देणार. बोन्ड अळीच वाटप झालेलं नाही खोटी माहिती दिली जात आहे. तुम्ही 37400 रुपये 30400 प्रति हेक्टरी अशी घोषणा केली होती ते वाटप झाले पाहिजे. विम्याचे पैसे खात्यावर अजूनही जमा नाही. कर्जमाफी पूर्णपणे मिळू शकली नाही. या सर्व विषयावर लेखी निवेदन दिले असल्याचे ते म्हणाले.
तसेच परळी शहर पाणी पुरवठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत प्रशासनाची काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
धनंजय मुंडे यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे काय माहिती देतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.




























































