जेव्हा गाडी थांबवून उद्धव ठाकरे उतरतात… शेतकऱ्य़ांची व्यथा जाणून घेतात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आमच्या जमिनी गेल्या. धरण उभे राहिले. मोबदला तर नाहीच पण गेल्या 15 वर्षांपासून त्यातील पाण्याचा एक थेंबही नशिबी आला नाही. आमच्या डोळ्यातले अश्रू मात्र कायम आहेत.’ मोठय़ा आशेने आणि विश्वासाने गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे यांनी आपुलकीने त्यांच्या व्यथा ऐपून घेतल्या आणि त्यांच्या प्रश्नात स्वतः लक्ष घालून ते सोडवण्याचे आश्वासन दिले.

विदर्भ दौऱ्य़ावर असलेले मुख्यमंत्री उद्धव यांनी पवनी व ब्रम्हपुरी येथे गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. घोडाझरी शाखा कालवा येथेही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांचा ताफा काही अंतरावरील हेलिपॅडच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या कडेला शेतकऱ्य़ांचा घोळका हातात कागद घेऊन थांबलेला त्यांनी पाहिला. उद्धव ठाकरे यांनी तातडीने आपली गाडी थांबवण्यास सांगितले. शेतकऱ्य़ांना भेटण्यासाठी ते गाडीतून खाली उतरले.

शेतकऱ्य़ांनी पोटतिडीकीने उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. गोसीखुर्द धरण्यातील पाण्याचा एक थेंबही चंद्रपूरमधील शेतकऱ्य़ांना मिळत नसल्याने काहीच फायदा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांची आस्थेवाईपणे चौकशी केली.

शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर तातडीने मार्ग काढण्याचे आदेश संबंधित अधिकऱ्य़ांना देण्यात येतील असे सांगून उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्य़ांना आश्वस्त केले. मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून आपला ताफा थांबवून आपले म्हणणे ऐपून घेतले याबद्दल शेतकऱ्य़ांनीही त्यांचे मनापासून आभार मानले.