राज्याचे हित प्रथम! पंकजा मुंडे यांच्या ट्वीटला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उत्तर

6303

भाजप नेत्या पंकजा मुंडे येत्या 12 डिसेंबरला गोपिनाथगडावर काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करून त्यांना धन्यवाद दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले होते. या ट्वीटला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून भाजप व माजी मंत्री ही ‘ओळख’ हटवली, आता लक्ष गोपिनाथगडाकडे

आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजाताई मुंडे. ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो, असे ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे पक्षात आहेत आणि राहतील हे स्पष्ट केले. ते म्हणाले, पंकजा मुंडे या पक्ष सोडणार अशा बातम्या प्रसारित होत आहेत. त्या सर्व खोट्या आहेत. पंकजा मुंडे यांनी पक्षात मोठी पदे भुषवली आहेत. दोनदा आमदार आणि एकदा मंत्रीसुद्धा राहिल्या आहेत. त्या पक्ष सोडण्याचा विचार करणार नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या