मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

1369
sharad-pawar-uddhav-thackeray

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस असून ते 80 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे शुभेच्छा देत त्यांच्या उदंड आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, ‘महाराष्ट्र विकास आघाडीचे मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!’

 

आपली प्रतिक्रिया द्या