कोस्टल रोड जानेवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत; काम अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणारा आणि पालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी लिंकदरम्यान बांधण्यात येणारा 10.58 किमीचा कोस्टल रोड सुरू होण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या मार्गाचे सद्यस्थितीत 83 टक्के काम पूर्ण झाले असून मरीन ड्राइव्ह ते वरळीदरम्यान अशी एक लेन जानेवारी 2024 मध्ये सुरू करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, तर संपूर्ण मार्ग मे महिन्यापर्यंत सुरू करण्यात येणार आहे.