कोइम्बतूर एक्स्प्रेस धावणार नव्या रूपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूरकरांचा मुंबई-कोईम्बतूर रेल्वे प्रवास सुरक्षित व अधिक गतिमान होणार आहे. कारण, मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-कोइम्बतूर एक्स्प्रेसच्या पारंपरिक रेकचे एलएचबी रेकमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला असून, 25 नोव्हेंबरपासून नव्या रूपात ही गाडी धावणार आहे.

मुंबई-कोईम्बतूर ही गाडी दररोज धावणार आहे. नवीन तंत्रज्ञानावर आधारित एलएचबी रेक जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 25 नोव्हेंबरपासून मुंबई येथून, तर 27 नोव्हेंबरपासून कोईम्बतूर येथून हा रेक जोडण्यात येणार आहे. मुंबई-कोईम्बतूर एक्स्प्रेसला नव्या रेकमुळे जुन्या डब्यांपासून मुक्ती मिळणार आहे.

एक फस्र्ट एसी, चार एसी-2 टियर, दहा एसी-3 टियर, दोन स्लीपर क्लास, दोन जनरल सेवंâड क्लास, एक जनरल सेकंड क्लास लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन, एक पँट्री कार आणि एक जनरेटर कार असणार आहे. 25 नोव्हेंबरपासून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 11013 चे आरक्षण बुकिंग सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरटीसीच्या वेबसाइटवर पाहाता येणार आहे.

अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता कमी

पूर्वी एक्स्प्रेस, सुपरफास्ट दर्जाच्या गाड्यांना आयसीएफचे डबे वापरले जात होते. मात्र, एलएचबीचे रेक अपघात झाल्यास एकमेकांवर आदळत नाहीत. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता कमी प्रमाणात असते. एलएचबी म्हणजे (लिंक हॉपमन बुश) होय. या डब्यांची निर्मिती जर्मन तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. यासाठी स्टीलनेस स्टीलचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे एलएचबीचे डबे वजनाने इतर डब्यांच्या वजनापेक्षा बारा टनांनी हलके असतात.