नगर जिल्हयात थंडीची लाट; पारा घसरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

उत्तरेकडून येणारे अतिथंड व कोरडे वारे, निरभ्र आकाश यामुळे मध्य महाराष्ट्रातील थंडी वाढली. नगर येथे राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली असून, पारा 12.4 अंशांवर स्थिरावला, तर पुणे 12.7, नाशिक 14.1 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी किमान तापमानात लक्षणीय घट, तर कोकण, मराठवाड्यात किंचित घट झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. उर्वरित राज्यातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते, असे नमूद करण्यात आले. पुढील दोन-तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील किमान तापमानात किंचित घट होईल. विदर्भातील नागपूरसह अन्य जिल्ह्यातील थंडी हळूहळू वाढत आहे.

नगर जिल्हयात आता थंडापासून संरक्षण करण्यासाठी शेकोट्याचा आधार घेतला जात आहे. सध्या राजकारण चांगलेच जोमात असताना थंडी सुरु झाल्याने रात्रीचा प्रचार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शहरातील नागरीक लवकर घराचे दरवाजे बंद करत असल्याने आता नेत्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री नेत्याचे कार्यकर्ते जागरण करत असून चौका चौकात शेकोट्या पेटण्यास सुरवात झाली आहे.