1 फेब्रुवारीपासून कॉलेज सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने आता शाळांप्रमाणे राज्यातील महाविद्यालयेही पुन्हा सुरू होणार आहेत. 1 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे आणि तंत्रशिक्षण महाविद्यालयांमधील वर्ग ऑफलाइन सुरू होणार आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तो निर्णय जाहीर केला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने 7 जानेवारीपासून राज्यातील महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली होती. आता रुग्णसंख्या कमी झाल्याने पुन्हा एकदा महाविद्यालयांचे वर्ग भरणार आहेत. स्थानिक प्रशासनाने प्रादुर्भाव, कंटेनमेंट झोनमधील नियोजन व आरोग्यविषयक सुविधांची उपलब्धता विचारात घेऊन महाविद्यालयांबाबत निर्णय घ्यावा असे उच्चशिक्षण विभागाने म्हटले आहे.