कलर्सवर येतोय रायझिंग स्टार

सामना प्रतिनिधी । मुंबई

कलर्स वाहिनी रायझिंग स्टार शोचा तिसरा सीझन टेलिव्हिजनवर घेऊन येत आहे.रायझिंग स्टारच्या या सीझनमध्ये प्रेक्षकांना असाधारण स्पर्धक पाहायला मिळणार आहेत. सर्व वयोगटाचे स्पर्धक त्यांच्या संगीताच्या कौशल्याने मने जिंकण्यासाठी तयार आहेत. निष्णात संगीत गुरुशंकर महादेवन, दिलजीत दोसांझ यांच्यासोबत या सीझनच्या प्रवासात गायिका नीती मोहन असणार आहे. या सीझनचे सूत्रसंचालन गायक-अभिनेता आदित्य नारायण करणार आहे. .16 मार्चपासून प्रत्येक शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. संगीत गुरू शंकर महादेवन म्हणाले, “मागील सीझनमध्ये रायझिंग स्टारवरील टॅलेंट पाहून मी मंत्रमुग्ध झालो होतो. मला खात्री आहे की, या वर्षीसुद्धा आम्हाला असाधारण टॅलेंट पाहायला मिळेल. माझा विश्वास आहे की, स्पर्धकांनी त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी या मंचाचा वापर करावा.