
टी 20 विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत टीम इंडियाचा दारुण पराभव झाल्यावर सोशल मीडियावर या विकृतांनी विराटवर राग व्यक्त करताना त्याच्या दहा महिन्यांच्या मुलीलाही सोडले नाही. सोशल मीडियावर अनेकांनी विराटच्या मुलीवर अर्वाच्य भाषेत कॉमेंट्स केल्या. असंवेदनशील टिप्पण्या आणि शिवीगाळ याचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर काहींनी या ट्रोलर्सला चांगलेच धारेवर धरले आहे. या घटनेनंतर पाकिस्तानचा माजी कप्तान इंझमाम उल हकही ट्रोलर्सवर भडकला आहे. विराटच्या नेतृत्वावर टीका करण्याचा हक्क तुम्हाला आहे, पण त्याच्या कुटुंबीयाकडे कोणीच बोट दाखवू शकत नाही. असे इंझमाम म्हणाला.
‘‘हा जीवनातील सर्वात खालचा स्तर असून अशा पद्धतीने त्रास दिला जातो. बाहेर जो काही विकृत ड्रामा सुरू आहे.तो पाहता आमचे चाहते खिलाडू वृत्ती विसरल्याचे दिसत आहे.’’
-विराट कोहली, कर्णधार टीम इंडिया




























































