
फिफा विश्वचषक 2022 च्या तिसऱया लढतीच्या दुसऱया हाफमध्ये सौदी अरेबियाने फुटबॉलमधील दादा संघ असलेल्या अर्जेंटिनाला जोरदार धक्का देत पाच मिनिटांमध्ये दोन गोल केले. विशेष म्हणजे दुसरा गोल हा पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आल्यानंतर सालीम अल्दवासरीने अगदी भन्नाट शॉट मारत केला. हा गोल इतका भन्नाट होता की, तो पाहून अरबी भाषेत कॉमेंट्री करणाराच इतका उत्साहात आला की, तो अल्लाह, अल्लाह, अल्लाह करू लागला. हा गोल आणि या समालोचकाची कॉमेंट्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे हाच सामन्यातील निर्णायक गोल ठरला आणि सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला 2-1 च्या फरकाने पराभूत केले.






























































