
सामना प्रतिनिधी । वसमत
वसमत शहरातील बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या रस्त्यावर पहाटे ६ वाजेपासून देशी दारूच्या दुकानावर येणाऱ्या दारुड्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनींनी पोलीस ठाणे गाठून व्यथा मांडली.
रहदारीला अडथळा आणत त्रास देणाऱ्या दारुड्यांचा बंदोबस्त करण्याची ग्वाही पोलीस निरीक्षक रवींद्रसिंग धुन्ने यांनी दिली. थेट पोलीस ठाण्यात येऊन भीती न बाळगता समस्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आला. तसेच पोलीस ठाण्याशी संबंधित कामकाजाची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.





























































