
अँटिलियासमोरील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याचे प्रकरण व हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये भाजपचे नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकर आरोप करत आहेत. आता एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीस गाडीतून 17 फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन यांनी प्रवास केला होता असे म्हटले जाते. सदर गाडीबरोबर एका फोटोत ठाणे भाजपचा पदाधिकारी दिसत आहे. त्याबद्दल भाजपने तत्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सीडीआर संदर्भातील माहिती तपास यत्रणांना न देऊन तसेच सीडीआर कोणी दिला हे न सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप सचिन सावंत यांनी केला. हिरेन मृत्यू प्रकरणातून सरकार अस्थिर करण्याचा राजकीय उद्देश साध्य करण्यापायी भाजप नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करत सुटले आहेत. यातून भाजप नेत्यांचा बेजबाबदारपणा पूर्णपणे दिसून आला आहे. 17 फेबुवारीला मनसुख हिरेन ज्या मर्सिडीस गाडीतून फिरले ती गाडी एनआयएने जप्त केली आहे. सदर गाडीबरोबर ठाणे जिह्यातील भाजप पदाधिकाऱयाचा फोटो आहे. बेछूटपणे आरोप करणाऱया भाजपने या कनेक्शनबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सावंत यांनी केली.




























































