वाहिन्यांवरील चर्चांमध्ये सहभागी होण्यास काँग्रेस प्रवक्त्यांवर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

विविध वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये काँग्रेस प्रवक्त्यांनी एक महिना सहभागी होऊ नये असा आदेश काँग्रेसने जारी केला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रयत्न करून बघितला मात्र त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घ्या असा हट्ट धरला आहे.

https://twitter.com/LostMystic_/status/1133929336388575232

 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारूण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला आहे. मात्र राहुल गांधीचा राजीनामा म्हणजे काँग्रेसची आत्महत्या असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केले आहे. ‘द टेलिग्राफ’ने याबाबत वृत्त दिले आहे.

एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत तर दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर राहुल गांधी भडकल्यामुळे त्यांची पदे धोक्यात आली आहेत. पराभवानंतर झालेल्या काँग्रेसच्या ‘चिंतन’ बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांच्या ‘पुत्रप्रेमा’वर ताशेरे ओढले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मुख्यमंत्री कमलनाथ, पी. चिदंबरम यांनी मुलांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. कमलनाथ यांचे पुत्र कसेबसे विजयी झाले तर राजस्थानात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेसची अवस्था वाईट झाली असून त्यांना फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.