
सामना ऑनलाईन । बंगळुरू
शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी आपण कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना दोनदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो. पण त्यांनी शेतकऱयांना एक रुपयासुद्धा माफ केला नाही, असे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज येथे सांगितले.
मोदी हे शेतकरीविरोधी असून त्यांना कर्जमाफीवर बोलण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही, असेही ते म्हणाले. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये भाजपच्या सरकारांनी शेतकऱयांसाठी काय केले, असा सवालही सिद्धरामय्या यांनी मोदी यांना विचारला आहे.
मोदी यांनी गाझिपूर येथील सभेत बोलताना कर्नाटकातील काँग्रेस-जदसे सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱयांना लॉलीपॉप दिला, असा आरोप केला होता.


























































