NDA म्हणजे No Data Available, खासदार शशी थरुर यांची केंद्र सरकारवर टीका

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. प्रवासी मजुर, शेतकरी आत्महत्यांवर कुठलीच आकडेवारी उपलब्ध नसल्याचे केंद्र सरकारने संसदेत म्हटले होते. आता काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी सरकारवर टीका NDA म्हणजे No Data Available असे म्हणून टीका केली आहे.


थरूर यांनी No Data available असे के व्यंगचित्र ट्विट करून म्हटले आहे की, प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला त्याची माहिती नाही, शेतकर्यांेच्या आत्महत्येची माहिती नाही, फिस्कल स्टिमुलसवर चुकीची माहिती, कोरोना मृतांवर भ्रामक माहिती, जीडीपीवर नेमकी माहिती नाही. या सरकारने NDA चा अर्थच बदलला आहे अशी टीका थरुर यांनी केली आहे.
संसदेत केंद्र सरकारला प्रवासी मजूर, शेतकरी विद्यार्थी आत्महत्या, जीडीपी, कोरोना मृतांचा आकडा यावर प्रश्न विचारले गेले. पण याबाबत कुठलीच आकडेवारी उपलब्ध नसल्याची कबुली केंद्र सरकारने दिली. फक्त रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेमध्ये 57 प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला होता याची माहिती दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या